युनिक स्टुडंट पुरस्कार प्रदान करण्यासाठी सिनेअभिनेते मा. राहुल सोलापूरकर व खासदार मा. श्रीरंग बारणे, शिक्षण समितीच्या उपसभापती सौ. शर्मिला बाबर, मा. राजाभाऊ गोलांडे, मा. अनंत कोऱ्हाळे , मा. रवींद्र नामदे, मा. शरद लुणावत, युनिक व्हिजनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, मुख्याध्यापिका सौ. रजनी दुवेदी व संयोजक नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
चिंचवड परिसरातील इयत्ता १०वी व १२ वी मधील ७०% पेंक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थांचा, तसेच P.H.D, C.A. , MBBS, CET, JEE, Olympiad , Nata , NEET, CPT, IPCC, NTS आदी परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण ७२८ विद्यार्थांचा स्मृतिचिन्ह व शिक्षण उपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
मा. राहुल सोलापूरकर यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. पुढील पिढी सुसंस्कृत व संस्कारक्षम व्हावी याकरिता पालकांनी जागृत राहिले पाहिजे. कोणतीही व्यक्ती जन्मत: गुणवंत नसते, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आई, वडील व शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवावे असे सांगितले. पुढील काळात यशाने हुरळून न जाता कठोर परिश्रम घेऊन पुढील यशाची शिखरे पादक्रांत करावीत अशा शुभेच्छा देऊन करिअर विषयक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी गुणवंत विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजिका अश्विनी चिंचवडे व आभार प्रदर्शन गजानन चिंचवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युनिक व्हिजन अॅकॅडमीचे सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पवना ग्रुप यांनी सहकार्य केले.