स्वातंत्र्यदिनाचे देशभर उत्साहाचे वातावरण असून देशातील नागरिक ७२ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करत आहेत. असे असतानाच तीकडे नवी
दिल्ली येथे भाजप मुख्यालयात मान्यवर अमित शहांच्या हस्ते ध्वजारोहण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
थोडक्यात घडले असे, आज नवी दिल्ली येथे भाजपा मुख्यालयात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते धजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता,
त्यावेळी अमित शहा यांनी ध्वज फडकाविण्याकरिता रस्सी खेचली व अचानक तिरंगा ध्वज स्तंभावरून खाली घरंगळत आला, झेंडा खाली पडतो कि काय असे वाटत असतानाच अमित शहांनी दुसरी रस्सी खेचत झेंडा पुन्हा वर नेला व फडकवला. हा क्षण पाहून अनेक मान्यवरांची धडकी भरली होती. योग्य वेळी झेंडा फडकल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडल्याचे पहावयास मिळाले.
काँग्रेसचे टीकास्त्र
घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसने भाजपावर टीकेचा भडीमार केला असून स्वातंत्र्यानंतर ज्यांनी केवळ तिरंग्याचा तिरस्कार केला, तो केला नसता
तर आज तिरंग्याचा अपमान झाला नसता. जे देशाचा झेंडा सांभाळू शकत नाहीत, देश काय सांभाळणार? असे टीकास्त्र काँग्रेसने ट्विटर च्या माध्यमातून सोडले आहे.