न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२०) :- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे ७ मार्च २०२० रोजी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमांर्तगत मज्जासंस्था विभागाच्या वतीने “न्यूरॉमेड – २०२०” या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने मेंदूमधील रक्तस्त्राव (स्ट्रोक) या विषयावर परिषद घेण्यात आली. यात वैद्यकीय महाविद्यालयातील १०० हून अधिक डॉक्टर्स उपस्थित होते. विविध तज्ञ् व्याख्यात्यांनी थ्रोम्पेक्टॉमी सारख्या तीव्र स्ट्रोकमध्ये करण्यात येणारे उपचार, आजाराबाबतची कारणे, लक्षणे, निदान, व संशोधन तसेच प्रगत तंत्रज्ञानाबाबत भाष्य करण्यात आले.