न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- दुबईहून परतेल्या करोनाग्रस्त रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले. त्यांची शोधाशोध सुरू असून, त्यातील काही जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात या दाम्पत्याच्या मुलीला करोनाचा संसर्ग झाला आहे.
त्याचबरोबर ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले, त्या कॅबचालक आणि विमानात त्याचसोबत असलेल्या एका सहप्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुण्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ झाली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
चीनमध्ये उद्रेक घातलेल्या करोना आजारानं जगभरासह भारतातही पाय पसरवायला सुरूवात केली आहे. करोनानं पुण्यात पाऊल ठेवलं असून, दोन जणांना लागण झाल्याचं मंगळवारी समोर आले. दुबईवरून परतलेल्या या रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. यात आणखी तिघांना संसर्ग झाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.


















