न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महारांजाची म्हणजेच आपल्या जाणता राजाची जयंती हिंदू धर्मारूढीनुसार जन्मतिथीला शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर परिसरातील सर्व शिवप्रेमी, गणेश उत्सव, नवरात्री मंडळ, हौसिंग सोसायटी संस्था, महिला मंडळ, बचतगट, हरिपाठ मंडळ, सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष व संघटना इत्यादी सर्वांच्या सहभागाने एकत्रितरित्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी होणार आहे.
कार्यक्रमची रूपरेषा फाल्गुन वद्य तुतीच्या वार गुरुवार दिनांक १२ मार्च २०२० रोजी भव्य मिरवणूक आरंभस्थान वेळ सायंकाळी ०४ वाजता श्री शनी मंदिर मैदान पूर्णानगर, मिरवणूक मार्ग- श्री शनी मंदिर मैदान पूर्णानगर-नक्षत्र फेज-१-शिवसाई चौक -दर्शन फर्निचर-श्री हनुमान मंदिर-तिरंगा चौक-पोलाइट चौक-छत्री गार्डन चौक-स्वा-सावरकर मंडळ-काका हलवाई चौक-शिवशंभो चौक-महाबली मंदिर-अष्टविनायक मंदिर चौक-समारोप श्री महालक्ष्मी मंदिर बहिरवाडे मैदान शाहूनगर.
मिरवणुकीतील विशेष आकर्षण किमान १००० नागरिकांची उपस्थिती, शिवरायांचा रथ,वारकरी भजनी मंडळ, ऐतिहासिक सजविलेले रथ, कमानी, साउंड सिस्टीम, छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत १०१ बाल, मावळ्यांच्या वेशभूषेत १०१ तरुण, पारंपरिक वेशभूषेत १०१ तरुणी व महिला, उपस्थित सर्व पुरुष महिला भगवा फेटा, संपूर्ण मिरवणूक मार्गावर व सर्व चौकात भगवेध्वज आणि स्वागत, ढोलपथक, अश्वरूढ मावळे, मिरवणुकीत मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या अश्या या आपल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या विलोभनीय वातावरण आपल्या समस्त शिवप्रेमी एकतेचे व संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या भव्य मिरवणुकीत शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब मित्र परिवारासह अवश्य सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक शिवजयंती उत्सव समिती अखिल शिवतेज, संभाजी, शाहू,पूर्णानगर यांनी केले आहे.


















