न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- पूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आयटी कंपन्यांना BCP – बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन ऍक्टिवेट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयटी एम्प्लॉईजचे प्रतिनिधी रविकिरण घटकार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ट्विटद्वारे केली आहे.
आयटी एम्प्लॉईजना कामानिमित्त वारंवार परदेश प्रवास असतो. त्यामुळेच ते जास्त रिस्की झोनमध्ये आहेत. आयटी कंपन्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून रेस्ट्रिक्टेड देशाची यादी तयारी केली आहे. त्यामध्ये दुबई चा समावेश नव्हता. त्यामुळे दुबई प्रवास करून आलेले एम्प्लॉयी कामावर रुजू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी BCP ऍक्टिव्हेट करणे अत्यंत गरजेचे आहे, असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
BCP – बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन?
व्यवसायाची सातत्य नियोजन ही एखाद्या कंपनीला संभाव्य धोक्यांशी सामना करण्यासाठी प्रतिबंध आणि पुनर्प्राप्तीची प्रणाली तयार करण्याची प्रक्रिया आहे. प्रतिबंध व्यतिरिक्त, आपत्ती पुनर्प्राप्तीच्या अंमलबजावणीपूर्वी आणि दरम्यान कार्यरत कार्ये सक्षम करणे हे या प्रणालीचे ध्येय आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपले महत्वाचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी कंपनीच्या दुसऱ्या लोकेशन चा व तिथल्या एम्प्लॉईजचा वापर केला जाऊ शकतो. बहुतांश वेळेस, एम्प्लॉईजना “वर्क फ्रॉम होम” ची सुविधा सुद्धा दिली जाऊ शकते. जेणेकरून, एखाद्या शहरात थांबवलेल्या कामामुळे कंपनीच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही या बाबतीत काळजी घेतली जाते.


















