- आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर राहुल जाधव स्पोर्टस् फाउंडेशनचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- आमदार महेश लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन आणि माजी महापौर राहुल जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने येत्या सोमवारी सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री राम शिंदे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच प.पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
चिखलीतील, जाधववाडी येथील रामायण मैदानात पारंपरिक रितीरिवाजानुसार सामुदायिक विवाह सोहळा सोमवार १६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी होणार आहे. सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना लग्नासारखे शुभकार्य पार पाडण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली जावे लागते. त्यांना मदत व्हावी. आपल्या हातून सामाजिक संवेदना जपत सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्याचे ३ रे वर्ष आहे. पहिल्या वर्षी २२, तर गेल्या वर्षी ५५ विवाह या सोहळ्यात लावण्यात आले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क वधूवरांकडून घेतले जात नाहीत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.















