न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाची मासिक सभा आज बुधवारी (दि. ११) रोजी आयोजित केली होती. प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. लिफ्टचे काम अपुर्णच असल्याने सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
‘लिफ्ट’साठी विद्युत निरीक्षकांची मान्यता घेण्यास जास्त कालावधी गेला. जुन्या इमारतीत लिफ्ट बसविली जाणार आहे. लिफ्टचे थोडे काम शिल्लक असून दीड महिन्यात पुर्ण होईल’ अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय खाबडे यांनी सभेत दिली.
कामानिम्मित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे येतात. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्याची सूचना भाजप नगरसेवक बाबू नायर यांनी मांडली. त्याला शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्रशासनाचा निषेध करुन १६ मार्चपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.















