न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- रावेत येथे जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिकावर पुतण्यांनी वार करून खूनी हल्ला केला. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. जखमीवर रावेत येथील खासगी रूग्णालयात व अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती नाजुक असल्याचे सांगण्यात आले.
साहेबराव तुकाराम भोंडवे (वय ६१, रा. रावेत) असे जखमीचे नाव असून या प्रकरणी आकाश ज्ञानेश्वर भोंडवे ( वय २४ ) आणि अमोल विलास भोंडवे ( वय ३१, दोघे रा. रावेत) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी साहेबराव यांच्या घराजवळ प्रकार घडला. आरोपी हे जखमी साहेबराव यांचे पुतणे असून त्यांच्यात जमिनीवरून वाद आहेत. या वादातुन या दोघांनी आज धारदार शस्त्राने चुलत्यावर वार करून जबर जखमी केले. त्यांना उपचारासाठी भोंडवे कॉर्नर येथील व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती नाजुक असल्याचे सांगण्यात आले. रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.


















