न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- करोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे तसेच करोना आजारास अटकाव करणेकामी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द करणे अथवा नव्याने रजा मंजूर न करणेबाबतचा आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी जारी केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणु संसर्गाचा धोका निर्माण झाला असून, सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखणे तसेच सदर आजाराचा संसर्ग झालेल्या नागरीकांना (रुग्णांना) जास्तीत जास्त मदत महापालिकेच्या वतीने पोहोचवण्याच्या दृष्टीने महापालिकेत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरीकांना वेळेत मदत पोहोच होणेकामी महापालिकेतील अधिकारी / कर्मचारी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.
आपत्कालीन परिस्थितीकरिता महापालिका अधिकारी / कर्मचारी उपलब्ध असणेचे दृष्टीने उपाययोजन करणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच सर्व विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी कामावर हजर असणे गरजेचे आहे. सबब, आयुक्त, पिपरी चिचवड महानगरपालिका, पिंपरी. आदेश देत आहे की, महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील तसंच सर्व विभागातील अधिकारी / कर्मचा-यांच्या दिनांक ३१ / ०३ / २०२० पर्यंतच्या सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय अत्यावश्यक रजा वगळून) संबंधित विभागप्रमुखानी मंजुर करु नयेत. तसेच जे अधिकारी / कर्मचारी । यापूर्वीच रजा मंजूर करुन रजेवर गेले असतील अशा सर्व अधिकारी / कर्मचा-याच्या रजा रद्द करण्यात येत आहेत. अशा अधिकारी / कर्मचा-यानी त्वरीत कार्यालयात रूजू व्हायाचे आहे. याशिवाय मनपाचे अधिकारी / कर्मचारी यानी सुट्टीच्यादिवशी देखील कार्यालयाचे परवानगीशिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये, याबाबतची कार्यवाही संबंधित विभागप्रमुखानी करावी व सदर आदेशाची तातडीने अमंलबजावणी करावी, अशा आदेशाचे परिपत्रक महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या सहीने महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांना जारी केले आहे.