न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- चीनमध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरस हा रोग साथीचा रोग झाला आहे. भारतासह तब्बल १३७ देशांमध्ये हा रोग पसरला आहे. अहवालानुसार, शनिवारपर्यंत जगभरात लागण झालेल्या लोकांची संख्या ही १५०,००० च्या वर गेली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३२र पोहचला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
आतापर्यंत १३७ देशांमध्ये ५५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत १०७ जणांना संसर्ग झाला आहे.
कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्रालयाने सांगितले की, आज १२ वाजेपर्यंत देशभरात परदेशी नागरिकांसह एकूण १०७ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यात खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमा हॉल बंद करण्यात आले आहेत.












