न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी एकाचे अपहरण केले व अहमदनगर रोडवरील आळंदी फाटा येथे नेऊन मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची घमकी दिली. ही घटना रविवारी ( दि . १५ ) रात्री एक वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली.
या प्रकरणी दर्शन वसंत ढोबळे ( वय २३ ) , राहुल विजय ढोबळे ( वय २२ , रा . विमाननगर , पुणे ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी भांडणाचा राग मनात घरून फिर्यादी यांना रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मोटारीतून त्यांचे अपहरण करन मारहाण केली.















