न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- करोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या करोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता.
“६९ वर्षीय इटालियन नागरिकाचा ह्रदय बंद पडल्याने जयपूरमधील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे,” अशी माहिती पीटीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनसुार, रुग्णावर यशस्वी उपचार झाले होते आणि करोनातून त्यांची मुक्तता झाली होती. पण त्यांचा मृत्यू करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यसंबंधी कारणांमुळे झाला की नाही याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.















