न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- तरुणीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या आणि अॅसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर नातेवाईकांनी तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथे घडली. आकाश विष्णू साळवी (वय २२, रा. पिंपरी) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी तरुणीच्या पाच नातेवाईकांनी आकाश याचे पिंपरी भाजी मंडई परिसरातून अपहरण केले. त्यास पिंपरी चिंचवड लिंक रोडवर घरकुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी सुरवातीला लाथा बुक्क्यांनी नंतर लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आणखी एकाने तलवारीने वार करून आकाश याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी आकाश याचे वडील राहुल आणि लहान भाऊ यांनाही मारहाण करून जखमी केले.












