न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निगडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून (एम एच १४ / जी जे ७८६९) आरोपी प्रतिबंधित गुटखा विक्री करण्यासाठी बाळगताना आढळून आला.
ही कारवाई बुधवारी (दि. २५) ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली. मेहबूब हुसेन करवल (वय २४, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष शामराव सावंत (वय ३३, रा. पिंपळे गुरव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीकडून १६ हजार ४५२ रुपयांचा गुटखा जप्त करत त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३, ३२८, तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












