न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- कॉविड-19 कॉरोना वायरस च्या वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस संचारबंदी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या वेळेत गोरगरीब जनतेचे हाल होऊ नये म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप लाला चिंचवडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या जोशी समाजातील लोकांना जिवनावश्यक वस्तू आणि मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी धनंजय वाल्हेकर, राकेश सूर्यवंशी, सागर सुतार, अमोल पाटील, चेतन वाघमारे, अतुल वर्पे, योगेश फूरडे आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली.


















