न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- तबलिगी जमातच्या काही लोकांना दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नुकताच दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमधील एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी ज्या ठिकाणी तबलिगींना ठेवण्यात आलं आहे त्याच्याच समोर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. यानंतर दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाइन सेंटरकडून याविरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ज्या दोन लोकांविरोधात हा एफआयआर दाखल केला आहे ते दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना सध्या दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन जण वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.












