न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- फिर्यादी यांचा १५ वर्षीय मुलगा १९ मार्च रोजी दुपारी मित्राला भेटून येतो, असे सांगून घरातून निघून गेला. तो सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी मुलाला फोन केला असता तो आकुर्डी येथे असून, थोड्या वेळाने घरी परत येतो असे त्याने सांगितले. मात्र, रात्रीपर्यंत तो घरी परत आला नाही.
त्यामुळे घरच्यांनी त्यांचे नातेवाईक आणि इतरत्र शोध सुरू केला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












