न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- हिंजवडी जवळील माण येथे १३ एप्रिल रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रवणकुमार यांनी आपले किराना मालाचे दुकान बंद केले.
बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून आतील १२० तांदळाचे कट्टे आणि गोडेतेलाचे बॉक्स असा एकूण एक लाख १३ हजार ९९२ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना हिंजवडी जवळील माण येथे मंगळवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली. श्रवणकुमार पुखराजजी गेहलोत (वय ४३, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. १४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












