- निर्जंतुकीकरणाद्वारे सोसायटीतील नागरिक कोरोनापासून राहणार सुरक्षित – संतोष सौंदणकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- चिंचवडगावातील रस्टन कॉलनी हौसिंग सोसायटीने सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर मशिन लावले आहे. या मशीनद्वारे सोसायटीतील नागरिकांचे निर्जंतुकीकरण करता येणे सोपे होणार आहे.
या मशीनची पाहणी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब नवले, ज्येष्ठ संचालक व्ही. डी. मालुसरे, सुभाष मालुसरे, सचिव महेश कुंभार, शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, रस्टन कॉलनी मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, अविनाश पवार, संदीप सत्तर, समीर कुरुळे आदी रहिवासी उपस्थित होते. या उपक्रमासाठी नितीन गवळी यांनी विशेष सहकार्य केले.
सोसायटीमधील अनेकजण अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर ये-जा करतात. बाहेरून येणाऱ्या रहिवाशाने किंवा अन्य कोणी सोसायटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच प्रवेशव्दाराजवळील सॅनिटायझर मशिनने त्याचे निर्जतकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना कोरोनापासून बचाव करता येणार आहे, अशी माहिती संतोष सौंदणकर यांनी यावेळी दिली.













