न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सुरू केलेल्या भाजीमंडईच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिग, सॅनिटायजेशनची व्यवस्था केली असल्याने त्याचा अवलंब करावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सोयीसाठी मोकळ्या जागांवर भाजी मंडई सुरू करण्यात आल्या असून नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या मंडईची पाहणी आज त्यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक राहूल भोसले, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रशासन अधिकारी दिलीप आढारी आदी उपस्थित होते.
मंडईत भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे तापमान मोजण्यात येत आहे. त्यानंतर हात सॅनिटाईज करून प्रत्येक नागरिकाला सोडण्यात येत होते. यावेळी नागरिक सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करून भाजीपाला खरेदी करीत असल्याचे दिसत होते. सुमारे पन्नास स्टाॅल या ठिकाणी उपलब्ध असून त्यामध्ये भाजीपाला व फळ विक्रीच्या स्टाॅलचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येणारी फळे व भाजीपाला केंद्रे :-
१) नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, सीटी प्राईड शाळेच्या शेजारी, प्राधिकरण निगडी
२) डी- मार्ट शेजारील भूखंड, रावेत.
३) गाव जत्रा मैदान, भोसरी.
४) अण्णासाहेब मगर स्टेडीयम, नेहरुनगर, पिंपरी.
५) सीडीसी ग्राऊंड, शनिमंदिर समोर, पुर्णानगर, चिखली.
६) सर्व्हे नं. ६२८, वनदेवनगर, थेरगाव.
७) पीडब्लूडी ग्राऊंड, सांगवी.













