न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दररोज तीन ते चार रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. महापालिकेने ९९ संशयितांचे सॅंपल कोरोना टेस्टसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते.
त्यांचा रिपोर्ट गुरुवारी रात्री प्राप्त झाला आहे. या रिपोर्टमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील ४२ वर्षाची महिला, तर तीन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. या पुरुषांचा वयोगट १९, ३१, ३३ असा आहे. हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण भोसरी परिसरातील आहेत.
त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली असून ३५ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. ९) रोजी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.













