न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- भारतीय जैन संघटना या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी घरात राहुन कोरोनाशी लढा देण्याचा हेतु मनात बाळगून कोरोना आजारावर मात करण्याचा द्रृढनिच्छय केला आहे. विद्यार्थांनी वाट्सप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना संदेश दिला आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, घराबाहेर पडू नका. स्वतःचे व आपल्या परिवाराचे या आजारापासुन रक्षण करा. सरकारच्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावं. सतत हात स्वच्छ धुवून घ्यावेत. इतरांच्या जास्त जवळ जाणं टाळावे. या आजारा संदर्भात काही लक्षण आढळून आल्यास स्वतःहून जवळपासच्या रूग्णालयात जावे. आपण सर्वजण एकत्र येवून नियमांचे पालन करू. घरात राहुन या आजाराशी लढा देऊ. सोशल मिडियावर यासंदर्भात चुकीचे मेसेज, किवा समाजात भेदभाव होईल अशा अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे.













