न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरवणे तसेच मास्क न वापरता घराबाहेर पडलेल्या दहा जणांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली.
नियम मोडणाऱ्या या नागरिकांच्या हातात करोना विषयक मजकूर असलेला फलक देऊन त्यांना जनजागृती करण्यास भाग पाडले. निगडी पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना जरब बसेल व टी रस्त्यावर येणार नाहीत.













