- पोलिसांकडून ३५ नागरिकांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी सुमारे ३५ नागरिकांकडून परेड, सुर्यनमस्कार तसेच यापुढील काळात नियम मोडणार नाही याची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी ही कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला. यामध्ये माजी महापौराचाही समावेश आहे.
उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी निगडी पोलिसांनी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या दहा नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही निगडी पोलिसांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ३५ जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले.












