न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पुणे पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला आणि त्यांच्या पत्नीला करोनाची बाधा झाली आहे. खासगी लॅबमध्ये त्यांचे अहवाल पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोघे ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला आहे.
पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली येथे वास्तव्यास आहे. कर्मचाऱ्याचे वय ४३ वर्ष आणि महिलेचे वय ३८ वर्ष आहे.या करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला दोन मुली आहेत. दाम्पत्यासह मुलींना महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोन्ही मुलींचे अहवाल हे पुण्यातील एनआयव्ही ला पाठवण्यात येणार आहेत.
त्यानंतर दोन्ही मुलींना करोना लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहरातील करोना बाधितांचा आकडा ५४ वर गेला आहे. यातील १३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.


















