न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- भोसरी, दिघी, दापोडी भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने या परिसरात जोरदार नाकाबंदी केली आहे.
या पार्श्वभूमीवर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाशेजारील गोकुळ हॉटेल ते गवळीमाथा, एमआयडीसी भोसरी रस्ता, गव्हाणे पेट्रोलपंप ते दिघी रस्ता, सिद्धेश्वर शाळेसमोरील रस्ता, तसेच दापोडीतील भाऊपाटील रस्ता, शिवाजी पुतळ्याकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच उद्या रविवारपासून सांगवी-दापोडी ते पिंपळे गुरव-दापोडी पूल बंद करण्यात येणार आहे.
यामध्ये अग्निशामक, रुग्णवाहिका आणि पोलीस यासह अत्याश्यक सेवेतील वाहनांना सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आज शनिवारी रोजी दिली आहे.


















