न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आणि प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.


















