न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच राज्य शासनाने आर्थिक स्तरावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात स्थावर खरेदी – विक्रीचे ( प्रॉपर्टी) व्यवहार सुरू करून त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीचा ( डीपीसी ) २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरीत वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.


















