न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयातील कोरोना संशयिताचे घशातील स्वेब शनिवारी पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. पिंपळे गुरव परिसरात राहणारी ही महिला असून तिचे वय २५ वर्षे आहे.
त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ६२ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४६ वर गेली आहे. एकूण १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३९ रुग्ण दाखल आहेत.


















