न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्या सरकार माफक स्वरुपातली परवानगी देणार आहे. उद्या २० तारखेपासून ज्या ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे. तर ग्रीन झोननमधील जिल्ह्यांत करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. अशा जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना राज्य सरकार परवानगी देणार आहे.
यासाठी आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही स्वरुपात मजुरांना प्रवास करावा लागणार नाही याची काळजी मालकांना घ्यावी लागेल. या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना या काळात बाहेर पडता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.


















