न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात दोन दिवसांपूर्वी एका महिलेने खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या महिलेला महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे मात्र तिची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे संबंधीत महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून डॉक्टरांनी तिला होमक्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, खासगी लॅबमध्ये टेस्ट केली असली तरी ज्यांना संशय असेल त्यांनी पालिकेच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करणे महत्वाचे आहे. या घटनेमुळे खासगी लॅबवर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


















