न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या करोनाबाधित महिलेची प्रसुती झाली असून त्या महिलेने जन्म दिलेले बाळ मात्र करोनामुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे शहरात आज अखेर ५८६ रुग्ण आढळले असून त्या आतापर्यंत ५० रुग्णांचा बळी गेला आहे. मात्र मागील १४ दिवसांपासुन उपचार घेणार्या १८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काल त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


















