न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात तब्बल ५५२ कोरोना बाधितांची नोंद झाली. एका दिवसातील ही राज्यातील सर्वाधिक वाढ झाली.
त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२०० झाली आहे. आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा २२३ पर्यंत जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत ५०७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान मागील चोवीस तासांत करोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला. तर १ हजार ५५३ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण संख्या १७ हजार २६५ वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या ५४३ जणांचा समावेश आहे.


















