न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- कोरोना रुग्ण आढळल्याने रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून पिंपळे गुरव मधील काही भाग सील करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
नरेंद्र सुपर मार्केट – महालक्ष्मी सुपर मार्केट – शेती परिसर -हरसिद्धी अपार्टमेंट – नदीच्या बाजूचा परिसर – मोरया पार्क रोड – आयनॉक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – साठ फुटी रोड – नरेंद्र सुपर मार्केट हा परिसर सील करण्यात येणार आहे. परिसरात प्रवेशबंदी तसेच परिसरातून बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सील केलेल्या परिसरात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात म्हटले आहे.


















