न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. मुंबई व पुणे या दोन्ही शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील २६ कर्मचारी करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे या २६ कर्मचाऱ्यांमध्ये १९ परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी दिली आहे.


















