- उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल; रुग्णसंख्या ६४ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची वृद्धी होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सोमवारी ४५ संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा आले होते. त्यापैकी एका २७ वर्षीय तरुणाला तसेच ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे.
तरुण हा पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात राहणारा आहे. तर महिला ही पिंपरीतील नेहरूनगर परिसरात वास्तव्यास आहे. हे दोघेही कोरोना संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले होते. तपासणीत दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६४ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४७ वर गेली आहे. एकूण १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३७ रुग्ण दाखल आहेत.


















