न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष सहाय्याने त्यांच्या मार्गर्शनाखालील धनंजय मुंडे युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील परळी-बीड जिल्ह्यातील ५०० कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे सोमवारी (दि. २०) रोजी घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
यावेळी विजय वडमारे, सचिन बडे, मनोज ऐनिले, विजय मोरे, अनिल अंकुशकर, पांडुरंग चटाले आदी सहभागी झाले होते.


















