- सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना कोवीड – १९ विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी शहरात कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आलेला आहे. त्या कालावधीत शहरातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी, अधिकारी यांना यापूर्वी पोलीस विभागामार्फत देण्यात आलेले पास २२ एप्रिलपर्यंत लागू रहातील असा आदेश मा. मनपा आयुक्त यांनी निर्गमित केला होता.
तथापी त्यामुळे या सेवेतील आस्थापना कर्मचारी / अधिकारी यांना महानगरपालिकेशी संपर्क साधून पुन्हा पास घेण्याबाबत त्रास होऊ नये, यासाठी उपाय योजना करण्याच्या सुचना महापौर माई ढोरे व सतारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या होत्या.
त्यानुसार पास घेण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील आस्थापना कर्मचारी / अधिकारी यांचे हेलपाटे वाचावेत व सुलभरित्या त्यांची सोय व्हावी, यासाठी यापूर्वी पोलीसांनी अत्यावश्यक सेवेतील आस्थापनेच्या कर्मचारी / अधिकारी यांना दिलेले पासची मुदत दिनांक ०३ / ०५ / २०२० पर्यंत ग्राह्य धरावी, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


















