न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्यास भाजप नगरसेविकेने अर्वाच्य शिवीगाळ करीत दमदाटी केली. या संदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली असून, संबंधित नगरसेविकेवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे शहरातील गरजू नागरिकांना अन्नाची पाकिटे वितरीत केली जात आहेत. त्या कामासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या सदस्यांना ओळखपत्रवितरीत करण्यात आली आहेत.
हे ओळखपत्र मिळावे म्हणून भाजपच्या एका नगरसेविकेने संबंधित अधिकाऱ्यास सोमवारी (दि. २०) मोबाईलवर संपर्क साधला होता. फोन उचलला नाही, म्हणून त्या नगरसेविकेने महापालिका भवनात संबंधित अधिकाऱ्यास शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.


















