- शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा यशस्वी पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- लॉकडाऊनमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरित्याच्या सवलतीच्या दरात धान्यांचे वाटप येत्या शनिवार (दि. २५) पासून होणार आहे. त्यासाठी रास्तभाव दुकाने १२ तास खुली ठेवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने १ मे पासून धान्य वाटप करण्याचा आदेश काढला होता. परंतु, शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धान्यवाटप तत्काळ सुरु करण्याची विनंती केली. त्यावर पवार यांनी विभागीय आयुक्तांना २५ एप्रिलपासून धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आदेश काढले आहेत. यासाठी सरसकट नागरिकांना, अटी-शर्तीविना आणि आधार लिंक नसलेल्या रेशनधारकांनाही रेशन मिळणार आहे.


















