न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरीत भाजीपाला विक्री करणा-या ६० जणांचे गाडे महापालिकेने आज (बुधवारी) सकाळी जप्त केले आहेत. त्यांना भाजीपाला परत देण्यात आला असून हातगाडी जप्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी महापालिकेने भाजीमंडई बंद ठेवल्या आहेत. पिंपरीतील भाजीमंडई समोर हातगाडीवरुन भाजीपाला, फळे विक्री केली जात होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाडे जप्त केले आहेत.
जप्त केलेले ६० हातगाडे अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा केले आहेत. तर, वाकड, सांगवी भागात देखील हातगाड्यांवर भाजीपाला विक्री करणा-यांवर कारवाई केली आहे. त्यांचा भाजीपालाही जप्त केला आहे. हा भाजीपाला इस्कॉन संस्थेला दिला जाणार आहे.












