न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सर्व पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (दि. २१) पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी १०० मिली सॅनिटायझर, एक फेस शील्ड, दोन कापडी मास्क, एक एन ९५ मास्क, विटामिन सी टॅबलेट कॅप्सूल प्रत्येकी २०, एक जोड हॅन्डग्लोज, एक गॉगल अशा साहित्याचे किट प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आले. एकूण ३ हजार संरक्षण किटचे वाटप करण्यात आले.
पोलीस आयुक्त म्हणाले, रमजान हा सण जवळ येत आहे. त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआरपीसी कलम १४४ नुसार पारित करण्यात आलेल्या आदेशाबाबत प्रबोधन करावे. आयुक्तालयातील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली, तर त्यांनी घाबरून जाऊ नये. आपण सर्वजण सोबत आहोत. हिमतीने काम करा. स्वतःला एकटे समजू नका. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.













