न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.


















