न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- देशभरातील पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. मात्र एवढी गंभीर परिस्थिती असूनही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत.
हे सात पोलीस कर्मचारी कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले आहे. झोन एक आणि झोन दोन मधील एकूण ७ पोलीस कर्मचाऱ्यांना आज (बुधवार) पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.


















