संकटकाळात मदतीला धावून येणारा नगरसेवक; शैलेश मोरे यांच्या कामगारीने नागरिक सुखावले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणू व लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड शहरात हातावरील पोट असणाऱ्या सर्वसामान्यांची दैना उडाली आहे. घरातील राशन संपल्यामुळे हे नागरिक कोरोनाचा धोका ओळखूनही अन्नासाठी रस्त्यावर इतरात्र फिरताना आढळून येत आहेत. शहरात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत असताना नगरसेवक शैलेश मोरे यांनी साहित्याची जुळवाजुळव करून, गहू, तांदूळ, डाळ, तेल मीठ व इतर आवश्यक वस्तूंचे ठराविक किलोमध्ये कीट करून प्रभागातील चिंचवड स्टेशन परिसरात नुकतेच वाटप केले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटमय काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सफाई कामगारदेखील आपली कामगिरी आणि जबाबदारी योग्य रितीने पार पडत आहे. त्यांच्यामुळे शहरात स्वच्छता राखण्यास मदत होत आहे. त्यांचे देखील हातावरीलच पोट असल्याने नगरसेवक शैलेश मोरे त्यांच्या मदतीला सरसावले आहेत. त्यांना या संकट काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आज शुक्रवारी (दि. २४) रोजी त्यांच्या एम्पायर इस्टेट परिसरातील जनसंपर्क कार्यालयात या सफाई कामगारांना धान्याचे वाटप केले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी नगरसेवक शैलेश मोरे यांचे आभार मानले.
नगरसेवक शैलेश मोरे यांनी कोरोनाच्या लढाईत पोलिसांना दोन वेळचा जेवणाचा घास मिळावा म्हणून अन्नाचे पाकिटे देखील पुरविली आहेत. त्यानंतर त्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पोलिस स्टेशन येथे सॅनिटायझर-टनेलची उभारणी करून दिली आहे. त्यामुळे संकटकाळात मदतीला धावून येणारे नगरसेवक म्हणून शैलेश मोरे यांच्या कामगारीने नागरिक सुखावले आहेत.















