- सामाजिक बांधिलकी जोपासत केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- राहटणी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल प्रकाश भालेराव यांची कन्या आराध्या हिचा वाढदिवस अतिशय सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
तिच्या वाढदिवसानिमित्त आजोबा प्रकाश भालेराव व वडील विशाल भालेराव यांनी कोरोना युद्धासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु. २४४१२.०० रुपयांची मदत केली. मदतीचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
आराध्याचे वडील विशाल भालेराव म्हणाले की, राज्यासह देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. ३ मे पर्यंत लॉकडॉऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळं अनेक लोक घरातच अडकले आहेत. गोरगरिबांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीस छोटासा हातभार लावत, सामाजिक बांधिलकी जोपासत, आगळ्यावेगळ्या पद्धतीने आराध्याचा वाढदिवस साजरा केला.
कोरोना’च्या लढाईत छोटी मुलंही उतरलेली दिसत असून, आपापल्या परीने कोरोनाच्या विरोधात शक्य होईल तसे लढण्यास मदत करत आहेत. त्याबद्दल आराध्या हिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे.















