न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- देशभरात २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.















