- नामदेव ढाके यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना दानशूर लोकांकडून केल्या जाणाऱ्या मोफत धान्य वाटपाला शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जागरूकतेमुळे खीळ बसल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेने नामदेव ढाके यांनी नुकताच केला होता.
या आरोपाला शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनी जोरदार पलटवार दिला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या रेशनिंग दुकानावरील धान्यावर कब्जा करण्याचा आणि हेच धान्य गरिबांना मोफत देत असल्याचा डाव भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आखला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांकडे तक्रार केली होती.
विरोधकांवर बेजबाबदार आणि चुकीचे आरोप करणाऱ्या सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. नामदेव ढाके यांचा बोलविता धनी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे आहेत. त्यांनी स्वत: पुढे येऊन आमच्यावर आरोप करावेत. महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या दालनात पत्रकारांशी ते बोलत होते.


















