न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या (CMCHSF) पुढाकाराने कोरोना आपत्ती व लॉकडाऊन बाबत वरिष्ठ अधिकारी व आमदार महेश लांडगे यांच्या बरोबर ऑनलाईन मिटिंग (वेबिनार) घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
रविवारी, (दि. २६) दुपारी १२ ते १ ह्या वेळेत ही ऑनलाइन वेब मिटिंग (Webinar) आयोजित करण्यात आलेली आहे. मीटिंगमध्ये अधिकारी व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार भवनचे उपरजिस्टार आघाव, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी होणार आहेत.
सोसायटी सदनिकाधारक नागरिक कोरोना आपत्ती व लॉकडाऊन बाबत प्रश्न, शंका असतील ते ८९७५२८२३७७ ह्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात. आपले प्रश्न सोसायटीच्या नावासहित पाठवावे. महत्वाचे निवडक प्रश्न मार्गदर्शकांना मीटिंगमध्ये विचारले जातील, असे आवाहन करण्यात आले आहे.


















